KDMC Bharti 2025: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापकीय अधिकारी (वाहतूक), सनदी लेखापाल/कंपनी सेक्रेटरी आणि व्यवस्थापकीय अधिकारी (IT) या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
पदांची माहिती: KDMC Bharti 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
प्रशासकीय अधिकारी | 04 |
व्यवस्थापकीय अधिकारी (वाहतूक) | 03 |
सनदी लेखापाल/कंपनी सेक्रेटरी | 04 |
व्यवस्थापकीय अधिकारी (IT) | 06 |
शैक्षणिक पात्रता:
- प्रशासकीय अधिकारी: कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त पदवी.
- व्यवस्थापकीय अधिकारी (वाहतूक): कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त पदवी.
- सनदी लेखापाल/कंपनी सेक्रेटरी: वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त पदवी.
- व्यवस्थापकीय अधिकारी (IT): विज्ञान शाखेची मान्यताप्राप्त पदवी.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज 28 जानेवारी 2025 पूर्वी खालील पत्त्यावर सादर करावा:
आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ:
अधिक माहितीसाठी https://kdmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नोट: उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि तपशीलवार जाहिरातीसाठी संबंधित PDF वाचा.
PDF जाहिरात | KDMC Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://kdmc.gov.in/ |