करवीर विधानसभा मतदार संघात पुन्हा ‘चंद्रदीप’, चुरशीच्या निवडणूकीत राहूल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव | Karveer Vidhan Sabha Election Result 2024
करवीर विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी 1976 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.
करवीरमध्ये चंद्रदीप नरकेंनी पुन्हा आमदारकी खेचून घेतली! राहुल पाटलांना करवीरच्या जनतेची सहानुभुती मिळालीच नाही
कोल्हापूर | करवीर विधानसभा मतदार संघात (Karveer Vidhan Sabha Election Result 2024) अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली आहे. चंद्रदीप नरके यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केल्यापासूनच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली होती.
21व्या फेरीत नरके यांचे लीड काहीसे कमी झाल्याचे पहायला मिळाले. तर तेविसाव्या फेरीत यात आणखी घट झाल्याचे पहायला मिळाले. 26 फेरी पैकी 24 फेरी अखेर चंद्रदीप नरके याना 5604 ची आघाडी घेतली. तर उर्वरित दोन फेरीत हे लीड आणखी कमी झाल्याचे पहायला मिळाले. असे असले तरी 2 हजारांच्या आसपास मताधिक्याने चंद्रदीप यांनी बाजी मारत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तसेच शिरोळ मतदार संघात देखील महायुती पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली असून तिथेही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून विधानसभेला काँग्रेस पुरती हद्दपार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.