बीड न्यायालयाचा निर्णय: खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) जामीन अर्जावर आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात राज्याचे लक्ष लागले होते की न्यायालय कराडला जामीन मंजूर करणार की कोठडीत वाढ करणार. अखेर न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मकोका अंतर्गत गुन्हा दाखल: वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कठोर कायद्यामुळे कराडला जामीन मिळणे कठीण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “मकोका” अंतर्गत कारवाईमुळे कराडला मोठा धक्का बसला आहे.
सीसीटीव्ही पुरावा महत्त्वाचा ठरला: कालच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी खंडणीसाठी आवादा कंपनीकडे संपर्क साधल्याचा पुरावा दिसून आला आहे. या फुटेजमुळे खंडणी प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने कराडला जामीन न देता न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
जामीनाची अडचण: न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीस जामीन मिळणे सोपे असते. मात्र, मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे कराडला लवकरच जामीन मिळणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.