कोल्हापूर | नोकरीच्या शोधात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरूण तरूणींसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. एकूण ६३९ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी खास रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Jobs Kolhapur)
या मेळाव्यामध्ये टेलर, एचआर एक्झिक्युटिव्ह / डेटा एंट्री ऑपरेटर, केंद्र व्यवस्थापक, ऑटोकॅड फॅकल्टी, आयसीआयसीआय बँक (सेल्स अकादमी), ग्राफिक डिझायनर फॅकल्टी, क्लीप्रोग्रामर फॅकल्टी, कौन्सेलर., व्ही.एम., मार्केटिंग, व्ही.एम. पीटी इन्चार्ज, जॉब इन्स्पेक्टर, लाइन पर्यवेक्षक, अभियंता, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सल्लागार, युनिट व्यवस्थापक, मुख्य दुकान पर्यवेक्षक, इ. पदे भरली जाणार आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा माध्यमातून ही भरती पार पडणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याची तारीख 23 मे 2023 असून करवीर तालुक्यातील हळदी येथे हा मेळावा पार पडणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नोंदणी केल्यास अधिक सोईस्कर ठरणार आहे.
जाहिरात | https://bit.ly/3eLQpJ2 |
नोंदणी करा | https://shorturl.at/bjE04 |