फ्रेशर्स उमेदवारांसाठी Amazon India मध्ये नोकरीची मोठी संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनने कर्मचारी कपात केल्याचे पहायला मिळाले होते. परंतु आता कंपनीने भारतात (Amazon India Recruitment) नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन सध्या डिव्हाइस असोसिएटच्या रोलसाठी बीटेक फ्रेशर्सची भरती करत आहे. अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातल्या सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. या भरती बद्दलचं वृत्त ‘टेक गिग’ने प्रसिद्ध केलं आहे.

अ‍ॅमेझॉन आपल्या भारतातील कार्यालयात डिव्हाइस असोसिएट पदासाठी नवीन कर्मचारी भरती करणार आहे. त्यासाठी बीई/बी टेक/ एमसीए/एमएस्सी पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच फ्रेशर्स उमेदवारही अर्ज करू शकतात.

  • 1) डिव्हाइस असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी बीई आयटी, ईसीई आणि ईईई, बीटेक, बीएस्सी किंवा विज्ञान व अभियांत्रिकीसारख्या विषयांमध्ये पदवी आवश्यक आहे.
  • 2) विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच्याशी संबंधित प्रोग्राम्सची (की वर्ड, एक्सेल, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स) ठोस माहिती असणं आवश्यक आहे.
  • 3) जुळवून घेण्याची आणि नियमित अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याची क्षमता आवश्यक आहे.
  • 4) पुढाकार घेण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची वृत्ती, स्वयंप्रेरित असणं आणि डेडलाइन पूर्ण करण्याचं आव्हान पार करण्याची क्षमता असली पाहिजे.

जबाबदाऱ्या : कंपनी तांत्रिकदृष्ट्या निपुण, सेल्फ मोटिव्हेटेड आणि डिटेल ओरिएंटेड कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. या पदावरची व्यक्ती अनेक प्लॅटफॉर्मवर चाचण्या पूर्ण करण्यात मदत करील. ठरलेल्या निकषांनुसार दैनंदिन गुणवत्ता तपासणी करतील आणि डेव्हिएशन्सचे अचूक अहवाल देईल. नवीन उपकरणांसाठी अ‍ॅमेझॉनच्या चाचणी प्रक्रिया, नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याची कामही ही व्यक्ती करील.

जॉब ‘Key’ फंक्शन्स :

  • 1) योग्य कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअर चाचण्या करणं.
  • 2) अद्ययावत सराव चाचण्या आणि प्रक्रियांचं मूल्यांकन करणं. ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती शेअर करणं. अ‍ॅपची फीचर्स आणि कार्यक्षमतेची सखोल तपासणी करणं.
  • 3) गुणवत्ता आणि उत्पादकता पातळीत नियमितपणा राखणं. आउटपुटच्या बाबतीत शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट मानकानुसार दररोज नियमित कामं करण्याची क्षमता पार पाडणं.
  • 4) चाचणी प्रक्रिया किंवा गुणवत्ता हमी तपासणी चालू असताना आढळलेल्या त्रुटींची नोंद ठेवणं.
  • 5) एसएलएनुसार प्रगतीचं निरीक्षण करणं.
  • 6) मानवी श्रम, तसंच कोणतंही आवश्यक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आवश्यक असलेली डिव्हाइसेस आणि चाचणी पद्धती अंगीकारण्यास सक्षम असणं.
  • 7) इंग्रजी भाषेचं व्याकरण, वाक्यरचना आणि शब्दसंग्रह आवश्यक.
  • 8) अ‍ॅप्समध्ये खोलवर जाण्याची क्षमता, सर्व व्हर्जन्समधल्या कार्यक्षमतेची तुलना करणं आणि व्हर्जन-स्पेसिफिक बदल सूचित करणं.
  • 9) पडताळणी, विश्लेषण आणि डेटा संकलनाच्या उद्देशासाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्सची नियुक्ती करण्यास सक्षम असणं.
  • 10) प्रगतीचा अहवाल देणं, समस्या कम्युनिकेट करणं आणि अडचणी मांडणं.