मुंबई | BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बीसीसीआयने याबाबत व्टिटरच्या माध्यमातून अधिकृत माहिती देत ‘या’ नोकरीसाठी (BCCI Job News) अर्ज मागवले आहेत. पुरुष संघाच्या निवड समितीच्या सदस्यपदासाठी ही नोकरी आहे. बीसीसीआयच्या संकेतस्थळावर त्यासाठी आवश्यक पात्रता आणि इतर निकषांची माहिती देण्यात आली आहे.
कामाचे स्वरुप – कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, टी20 आणि इतर प्रकारच्या खेळांसाठी Senior संघाची निवड करणे. (BCCI Job News)
बीसीसीआयच्या नियमांचे पालन करणे
– प्रत्येक प्रकारातील सामन्यांसाठी संघाच्या कर्णधाराची निवड करणे.
– बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित माहिती माध्यमांना देणे, पत्रकार परिषदांना संबोधित करणे.
– आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी प्रवास करणे.
– दर तीन महिन्यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठांना संघाच्या, खेळाडूंच्या कामगिरीचा अहवाल देणे.
– आवश्यकतेनुसार बैठकांना उपस्थित राहणे.
– नि:ष्पक्षपातीपणे आणि पारदर्शीपणे संघातील खेळाडूंची निवड करणे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने खालील क्रिकेट प्रकारांमध्ये खेळलेले असावे
– 7 कसोटी सामने
– 30 प्रथम श्रेणी सामने किंवा
– 10 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने
– सदरील व्यक्तीनं खेळातून किमान 5 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतलेली असावी.
अर्जदारांनी या पदासाठी 30 जून 2023 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. यासाठी https://forms.gle/r4d4V9i7UHqGdfbTA या संकेकस्थळावर भेट द्या. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडेल.