News

Jitendra Awhad यांचं पोलिसांना थेट आव्हान, म्हणाले; “गोट्या गित्ते आणि गँगला …”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील संशयित वाल्मिक कराडचा साथीदार गोट्या गित्ते याच्या विरोधात पोलिसांना थेट आव्हान दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (माजी ट्विटर) पोस्ट करत म्हटले की, “बबन गित्ते यांचे निकटवर्तीय स्वप्निल पुजारी याच्यावर गोट्या गित्ते आणि त्याच्या टोळक्याने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणातील सर्व पुरावे असूनदेखील पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. मात्र, न्यायालयाने १५६(३) प्रमाणे आदेश देत गोट्या गित्ते आणि टोळीविरुद्ध आयपीसी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.” त्यांनी पोलिसांना या आदेशाची अंमलबजावणी करत गोट्या गित्ते आणि त्याच्या टोळक्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडे समर्थक टोळीचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल
तसेच, आव्हाड यांनी काल एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही जण धनंजय मुंडे यांच्या नावाने घोषणा देत इतर लोकांना धमकावताना व मारहाण करताना दिसत आहेत. या टोळक्याने मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आव्हाड यांच्या या टीकेनंतर प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button