जयसिंगपूर मध्ये 81 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकास अटक | Jaysingpur Crime News
जयसिंगपूर | ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणीक दत्तात्रय गुरव (रा. ग्रीन व्हॉली अपार्टमेंट, स्टेशन रोड, जयसिंगपूर) याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे. विजय बाळासाहेब माणगावे यांनी याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेणीक गुरव याने समर्थ ट्रेडिंग अँड सव्हीसेस या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने माणगावे यांना एकूण ९१ लाख रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यापैकी १० लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ८१ लाख रुपये आणि त्यावरील परतावा न दिल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. ही घटना ४ ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४ दरम्यान घडली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री श्रेणीक गुरवला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण माने करत आहेत.