Sunday, September 24, 2023
HomeCareer10वी ते पदवीधरांना जालना येथे नोकरीची संधी; 217 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित...

10वी ते पदवीधरांना जालना येथे नोकरीची संधी; 217 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित नोंदणी करा | Jalna Jobs

जालना | जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी (Jalna Jobs) उपलब्ध झाली आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यतील तरूणांना नोकरी मिळवता येणार आहे. “प्रशिक्षणार्थी” पदाकरीता स्पेशल जॉब फेअर-4 चे त्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याची तारीख 12 जुलै 2023 आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून 217 पेक्षा अधिक रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, जालना येथे 12 जुलै रोजी उपस्थित राहायचे आहे. (Jalna Jobs)

या पदभरतीसाठी एसएससी/ एचएससी/ डिप्लोमा/ पदवीधर तसेच विविध ट्रेड मधील आयटीआय धारकांना नोकरीची संधी मिळणार आहे. वैभव एंटप्रायझेस या कंपनीसाठी ही भरती होणार आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर तात्काळ नोंदणी करावी. (Jalna Jobs)

जाहिरातrojgar.mahaswayam.gov.in 
ऑनलाईन नोंदणीrojgar.mahaswayam_register

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular