Tuesday, September 26, 2023
HomeCareerजळगाव महापालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती |...

जळगाव महापालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती | Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023

जळगाव | जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM” पदांच्या रिक्त जागांचा समावेश आहे. (Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023)

रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि.१९/०६/२०२३ ते दि. २३/०६/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत जमा करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज व जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बाय हॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरीयर व्दारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव, पिन ४२५००१ या पत्त्यावर सादर करावेत. (Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023)

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पोस्टाने अथवा कुरीयने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. अर्ज बायहॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा कुरियरने विहीत मुदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार करण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.

PDF जाहिरात – https://shorturl.at/airF7

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular