मुंबई | दहावी नंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्याच्यासाठी ही बातमी महत्वाची असून 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ITBP अर्थात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात 10वी पास उमेदवारांसाठी ड्रायव्हर भरतीची घोषणा केली आहे. (ITBP Recruitment 2023)
याभरती संदर्भात ITBP ने ड्रायव्हर भरती 2023ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या 458 पदांसाठी ही भरती करणार आहे. अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज 27 जूनपासून सुरू होतील. तर उमेदवार 26 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकतील. (ITBP Recruitment 2023)
ITBP ड्रायव्हर पदासाठी वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर सर्व माहिती या लेखात दिली आहे. याशिवाय, अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर देखील पाहू शकतात. (Recruitment of Driver in ITBP job for 10th pass)
पदांचा तपशील
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 मध्ये, सामान्य श्रेणीसाठी 195 पदे, OBC साठी 110 पदे, EWS साठी 42 पदे, SC साठी 74 पदे आणि ST साठी 37 पदे ठेवण्यात आली आहेत. 458 पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे ठेवण्यात आले आहे. या भरतीमधील वय 26 जुलै 2023 हा आधार मानून मोजला जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी पात्रता निकष 10 वी पास आहे. यासोबतच उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवानाही असावा.
ITBP भरतीसाठी अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर ITBP Driver Recruitment 2023 वर क्लिक करा. ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. आणि Apply Online वर क्लिक करा. त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर, तो अंतिम सबमिट करा. यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
PDF जाहिरात – https://itbp_driver/recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (27 जुन 2023 पासून सुरु) – application_itbp/recruitment
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल” पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 09 जुन 2023 पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.
वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक अर्जदार खालील ऑनलाइन अर्ज लिंक वापरू शकतात. कोणताही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा. ऑनलाईन अर्जाची लिंक 09 जुन 2023 पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/MNRZ8
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/COQX2