Google कंपनीत होणार रिक्त पदांची भरती! पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | IT Jobs

मुंबई | भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. (IT Jobs) आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगलनं फुल स्टॅक इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे. 

  • सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर जबाबदाऱ्या
  • उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा याचा चांगला अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना इतर इंजिनीअर्सनी डेव्हलप केलेल्या रिव्ह्युविंग कोडचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. कारण, त्यांना सॉफ्टवेअर क्वालिटी सुनिश्चित करण्यासाठी फीडबॅक द्यावा लागेल.
  • उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
  • ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टम इश्युज, समस्यांचे स्रोत, हार्डवेअर, नेटवर्क किंवा सर्व्हिस ऑपरेशन्स आणि गुणवत्तेवर होणारे परिणाम यांचं विश्लेषण करून डीबग/ट्रॅक/निराकरण करता आलं पाहिजे.
  • उपलब्ध तंत्रज्ञानाबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
  • आवश्यक निकष
  • बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.
  • एक किंवा अधिक प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रक्चर्स/अल्गोरिदमचा पाच वर्षांचा अनुभव पाहिजे.
  • सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची चाचणी, देखरेख किंवा लाँच करण्याचा तीन वर्षांचा अनुभव आणि सॉफ्टवेअर डिझाइन आणि आर्किटेक्चरचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
  • फुल स्टॅक इंजिनीअर जबाबदाऱ्या –
  • उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा हे माहित असलं पाहिजे.
  • उमेदवाराला टेक्नॉलॉजीबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
  • उमेदवाराला इतर डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेले कोड रिव्ह्यु कसे करावे हे माहीत असलं पाहिजे. सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी फिडबॅक देता आला पाहिजे.
  • उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
  • आवश्यक निकष
  • पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयातील पीएच.डी. किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे.
  • फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. याशिवाय, जावा, पायथॉन, गो, C++ कोडबेसेस, जावा स्क्रिप्ट, टाइप स्क्रिप्ट, एचटीएमएल, सीएसएस, इत्यादींसह फ्रंट-एंड अनुभव असला पाहिजे.
  • अॅक्सेसेबल तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनुभव पाहिजे.

Previous Post:-

मुंबई | भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. (IT Jobs) आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगल आणि विप्रोनं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची नेमणूक सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांचं या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गुगल मध्ये काम करण्यासाठी जबाबदाऱ्या:-
1. सिस्टिम किंवा प्रॉडक्ट कोडिंग डेव्हलपमेंट करणं.
2. स्टेक होल्डर्स आणि पीर्ससह डिझाइन मूल्यांकनाद्वारे तंत्रज्ञानाची निवड करणं.
3. सर्वोत्तम प्रॉडक्ट डेव्हलप व्हावं यासाठी इतर डेव्हलपर्सच्या कोडिंगमध्ये योगदान देणं. (उदाहरणार्थ- स्टाईल गाइडलाईन्स, कोड इन चेकिंग, अॅक्युरसी, टेस्टॅबिलिटी आणि एफिशिअन्सी)
4. प्रोग्रॅम/प्रॉडक्ट अपडेट्स आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून सूचना सामग्री आणि डॉक्युमेंटेशन अपडेट करणं

नोकरीसाठी आवश्यक निकष:-
1. बॅचलर डिग्री किंवा तुलनात्मक कामाचा अनुभव.
2. जावा, जावा स्क्रिप्ट, सी, किंवा पायथॉन लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर तयार करण्याचा एक वर्षाचा अनुभव.

गुगल व्यतिरिक्त, टायटन आणि विप्रोसारख्या कंपन्या कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आणि पदवीधरांना कामावर घेत आहेत.
विप्रो भारतभर विविध पदांसाठी तंत्रज्ञांची भरती करत आहे. चेन्नईमध्ये, विप्रो सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या शोधात आहे.

सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:-
1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखे विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपचं टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
4. इंजिनीअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
6. व्हर्च्युअल सेटिंगमध्ये सिम्युलेशन आयोजित करून, क्लायंटला ऑप्टिमाइझ केलेले सोल्युशन्स पुरवणं.

विप्रो आपल्या हैदराबाद येथील ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या शोधात आहे.

सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखं विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपची टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
4. इंजिनिअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
6. ओपन इश्युजचं निराकरण करत असताना कोणत्याही सॉफ्टवेअर इंटिग्रेशन टीम किंवा क्लायंटनं रिपोर्ट केलेल्या समस्या दूर करणं.
7. क्लायंटसाठी सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन गुणवत्ता नियंत्रण पद्धती आणि योजना तयार करणं.
8. थोड्या उशीरानं पण जास्तीत जास्त परिणामकारकतेसह ऑन-टाईम ट्रबलशुटिंग, डीबगिंग आणि सिस्टिम अपग्रेड करणं.