Tuesday, September 26, 2023
HomeCareer‘ही’ आयटी कंपनी करणार 1300 इंजिनीअर्सची भरती; Chat GPT सेवेसाठी राबवली जाणार...

‘ही’ आयटी कंपनी करणार 1300 इंजिनीअर्सची भरती; Chat GPT सेवेसाठी राबवली जाणार प्रक्रिया

सध्या जगभर चर्चेत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे आयटीसह काही क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आयटी कंपनीने मात्र कामगार भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेतून 1300 नवीन अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. यामागची कारणं कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहेत. कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉमने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

मायक्रोसॉफ्टद्वारे निधी पुरवल्या जाणाऱ्या ओपन एआयच्या चॅट जीपीटीची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे वाढती गरज लक्षात घेऊन चॅट जीपीटीच्या सेवांमध्ये बदल केला जात आहे. ही तयारी एकाच वेळी सुरू आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, यामुळे सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज वाढत आहे. कारण विविध क्षेत्रातले व्यवसाय चॅट जीपीटीसारख्या सेवा वापरण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धती शोधत आहेत. यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

या पार्श्वभूमीवर हॅपीएस्ट माइंड्स या आयटी कंपनीने तिच्या इतिहासातल्या सर्वांत मोठ्या कर्मचारी विस्ताराचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी 1300 नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या प्रक्रियेमुळे कंपनीतल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5000 होईल.

हॅपीएस्ट माइंड्सचं एक टूल एआयवर आधारित पॉडकास्टच्या स्क्रिप्टमधल्या शब्दांच्या भावना सहजपणे ओळखू शकते. तसंच एखाद्या व्यक्तीच्या आवाजाप्रमाणे ते स्क्रिप्ट मोठ्या आवाजात वाचू शकते. नीरस रोबोटिक आवाजाच्या तुलनेत आवाजाचा हा एक वेगळा प्रयोग आहे, असं कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर मंथा यांनी सांगितल्याचं ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, हॅपीएस्ट माइंड्सचे सहसंस्थापक जोसेफ अनंतराजू यांनी या संदर्भात एका मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, की विकसनशील तंत्रज्ञान वापरण्यात स्वारस्य असलेल्या शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या उद्योगांमधल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी फर्म आपला एआयशी संबंधित व्यवसाय विस्तारत आहे.

हॅपीएस्ट माइंड्स कंपनी माहिती तंत्रज्ञान बाजारपेठेतल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना चॅट जीपीटीचा सर्वोत्तम वापर करायचा आहे, असं अनंतराजू यांनी नमूद केल्याचं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना ही अॅड-ऑन क्षमता दाखवण्यास सुरुवात केली आहे, असंही त्यांनी या वेळी सांगितलं.

हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजिज अशी उत्पादनं विकसित करत आहे, जी चॅट जीपीटीवर आधारित आहेत. ही उत्पादनं कंपनीच्या ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेली आहेत. यामध्ये खासगी डेटा आणि बौद्धिक संपदेचा खुलासा न करता चॅट जीपीटीचा वापर करण्यासाठी संस्थांना सक्षम करणाऱ्या उपायांचा समावेश आहे. सध्या चॅट जीपीटीच्या क्लायंटसाठी त्यांची गोपनीयता हा चिंतेचा विषय आहे. त्यावर आम्ही योग्य मार्ग काढला आहे, असं अनंतराजू यांनी सांगितलं. या वाढलेल्या मागणीमुळे कॉर्पोरेशनने त्यांचे भांडवल वाढवण्यासाठी योजना विकसित करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.

हॅपीएस्ट माइंड्स टेक्नोलॉजिज कंपनी व्यवसायांना त्यांच्या सेवा ऑफरच्या डिजिटायझेशनमध्ये साह्य करून त्यातून बहुतांश उत्पन्न मिळवते. कंपनीची एआयशी संबंधित उत्पादनं आणि सेवांची विक्री या कमाईचा एक छोटासा भाग आहे. असं असूनही 12 वर्षं जुन्या असलेल्या या संस्थेसाठी ही सर्वांत वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आहे, असा विश्वास अनंतराजू यांना वाटतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजिज कंपनी चॅट जीपीटीमध्ये सुधारित प्रवेशास परवानगी देणाऱ्या रिलेशनशिपवर ओपन एआयचे समर्थक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनशीदेखील चर्चा सुरू केली आहे. एकूणच हॅपीएस्ट माइंड्स ही कंपनी चॅट जीपीटीसाठी नव्याने कर्मचारी भरती करणार असून, अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular