इस्राईलच्या शेतीमधील डॉक्टर आणि आपल्या भारतीय शेतीतील डॉक्टर.., पहा नेमका फरक काय? Israeli agriculture doctor V Indian agriculture doctor

मी जेव्हा इस्राईलला शिक्षणास होतो तेव्हा मी हे बघितले आहे की आमच्या फार्मला जे कन्सल्टंट (आपल्या भाषेत – डॉक्टर) होते. त्यांच्याशी माझं नेहमीच बोलणं व्हायचं तर त्या जवळील प्रदेशांमध्ये अशी परिस्थिती आहे की जेव्हा एखादा व्यक्ती कन्सल्टंट होतो.

तर त्याच्याकडे त्या त्या पिकाबद्दल काहीतरी मास्टर शिक्षण थोडक्यात पीएचडी वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्याकडे कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभव त्या पिकांमधील असला पाहिजे.

त्यानंतरच तो कन्सल्टंट होऊ शकतो आणि याकडे गव्हर्मेंट लक्ष देत तर त्यामुळे आमच्या त्या पूर्ण एरियामध्ये जवळपास पूर्ण त्या एका पिकावर काम करणारा तो एकटाच होता आणि तो सगळ्यांना मार्गदर्शन करत होता,. हे 2013 ची गोष्ट आहे त्यानंतर आता तर खूप काही बदलले आहे.

पण आपल्याकडे मात्र ज्याला थोडाफार अनुभव आला तोच मार्गदर्शक किंवा कन्सल्टंट किंवा डॉक्टर होऊन जातो तर त्यामुळे स्वतःच्या शेतामध्ये आलेला अनुभव किंवा एखाद्या उत्पादनाचा आलेला रिझल्ट दुसऱ्याकडे येईलच असं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट कदाचित येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ती फसवणूक देखील वाटते त्यामुळे जर कन्सल्टंट व्हायचं असेल कोणाला जसं मी अगोदर सांगितले त्याप्रमाणे जर असं काही करता आलं तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होईल.

मी प्रत्येक मीटिंगमध्ये जेव्हाही गव्हर्मेंट अधिकारी किंवा कोणाशी माझं बोलणं होतं तेव्हा पण मी हा विषय घेत असतो आणि शेतकऱ्यांची देखील बोलत असतो कारण की जर आपल्याला असं काही मार्गदर्शक मिळाला की ज्याने उच्च शिक्षण घेतलेला आहे आणि त्या त्या पिकावर रिसर्च केला आहे तर नक्कीच त्याच्यामुळे खूप फायदा होतो जसं मी स्वतःही थोडेफार प्रयत्न करत आहे.

जो मी इस्राईल ला अनुभव घेतला आहे तर त्याचा पुरेपूर वापर इकडे कमीत कमी 30 ते 40% उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यात यशस्वी देखील होतो आणि हा त्या शिक्षणाचा आणि त्या अनुभवाचा फायदा होतो तर याच प्रमाणे जर आपण प्रत्येक पिकावर जर असे अनुभवी व्यक्ती पुढे आणू शकलो आणि ते लायसन्स मध्ये करू शकलो तर त्याचा खूप फायदा होईल.