8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

अंड्यातील पिवळा बलक खाणं योग्य की अयोग्य! l Is egg yolk good for health or not?

अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? बलक खाणं चांगलं आहे की वाईट? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत सविस्तरपणे…

Is egg yolk good for health or not?

अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रथिनं आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. अंडे सहज उपलब्ध होत असल्याने याला ‘सूपरफूड’ असेही म्हटले जाते. दररोजच्या आहारात एका तरी अंड्याचा समावेश करायला हवा. परंतु बरेच लोक (Is egg yolk good for health or not?) अंड्यातील पिवळा बलक खाणं टळतात, त्याची वेगवेगळी कारणे आहेत.

अंड्यातून मिळणारे महत्वाचे घटक –

प्रोटीन्स, अ जीवनसत्व,ड जीवनसत्व, व्हिटॅमिन बी-2,व्हिटॅमिन बी-12 असे अनेक पौष्टिक घटक अंड्यामध्ये असतात.

अंडी खाण्याचे फायदे –

अंड्यात ‘आयर्न आणि बायोटिन’ हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. (Is egg yolk good for health or not?) बायोटिन केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयुक्त असतो जो आपल्याला अंड्यातून सहजी मिळू शकतो.

आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील अंड्यातील घटक उपयोगी ठरतात.

अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ड-जीवनसत्व (Vitamin-D) असते (Is egg yolk good for health or not?) जी आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते.

एका अंड्यामध्ये सुमारे 100 mg कोलीन असते जे मेंदूला चालना देण्याचे काम करते, यामुळे अनेक डॉक्टर दररोज एक तरी अंडे खावे असा सल्ला देतात.

हाय डेनसिटी लिपोप्रोटिन म्हणजेच एच.डी.एल. कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास अंडी मदत करतात. (Is egg yolk good for health or not?) एच.डी.एल. ला चांगले-कॉलेस्ट्रॉल असेही म्हणतात.

अंड्याच्या पिवळ्या बलकात कॉलेस्ट्रोलचं प्रमाण खूप जास्त असते. शरीरात वाढणाऱ्या कॉलेस्ट्रोलमुळे हृदयविकाराचा धोका जास्त बळावतो. त्यामुळे लोक या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात. (Is egg yolk good for health or not?) परंतु अंड्यातील पिवळा बलक योग्य प्रमाणात खाल्यास काहीही धोका होत नाही. दररोज अंड्यातील एक ते तीन पिवळे बलक खाण्यास हरकत नाही.

  

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles