IRCTC येथे विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा | IRCTC Bharti 2025

IRCTC Bharti 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (IRCTC) अंतर्गत सल्लागार पदाच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करण्याची संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

भरती तपशील: IRCTC Bharti 2025

  • पदाचे नाव: सल्लागार
  • पदसंख्या: 08
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक.
  • वयोमर्यादा: 64 वर्षांपर्यंत
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ई-मेल:

  • ऑफलाईन पत्ता:
    अतिरिक्त महाव्यवस्थापक (HRD),
    IRCTC उत्तर क्षेत्र कार्यालय,
    रेल यात्री निवास बिल्डिंग,
    नवी दिल्ली रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स,
    अजमेरी गेट साइड, नवी दिल्ली – 110002.
  • ई-मेल पत्ता: recruitmentnz@irctc.com

अर्ज कसा कराल?

  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज थेट दिलेल्या पत्त्यावर पाठवावा किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला (https://www.irctc.com/) भेट द्यावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/FDGlX
अधिकृत वेबसाईटhttps://www.irctc.com/