News

विमाधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची: आता मिळणार अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट | Insurance Claim settlement

मुंबई | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) महत्वाचे निर्देश दिले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात विमाधारकांना आयआरडीएआयने मोठा दिलासा दिल्याचे दिसत आहे. जीवन आणि आरोग्य विम्यात अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट आणि सात दिवसात पेमेंट (Insurance Claim settlement) देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. डिजिटलायझेशनची किमया साधत विमाधारकांना कंपन्यांच्या जाचातून आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

विमा कंपन्यांनी देय तारखेच्या किमान एक महिना आधी प्रिमियम देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट संबंधीची माहिती पाठवणे आवश्यक आहे. जर कंपन्यांनी त्यात कुचराई केली तर ग्राहकांनी लोकपालाकडे तक्रार करावी असे IRDAI ने स्पष्ट केले आहे. आरोग्य विमा क्षेत्रात कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लूक पीरियड संबंधी विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

IRDAI ने विमा कंपन्यांना महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीसाठी 30 दिवसांचा फ्री लूक कालावधी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. फ्री-लूक कॅन्सलेशन केल्यावर ग्राहकांना 7 दिवसांत प्रीमियम रक्कम रिफंड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पॉलिसी कर्ज आणि मूळ पॉलिसीतील नियम आणि अटीतील बदल पण सात दिवसांच्या आत होण्याची वकिली करण्यात आली आहे.

3 तासात कॅशलेस क्लेम सेटलमेंट – Insurance Claim settlement

आरोग्य विम्याबाबत IRDAI ने महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार कॅशलेस क्लेमची सेटलमेंट 3 तासांच्या आत व्हायला हवी. याशिवाय IRDAI ने मास्टर सर्कुलरमध्ये ग्राहकांना विमा संबंधीची सर्व माहिती सविस्तर पाठवण्याची सूचना केली आहे. ही माहिती स्थानिक भाषेत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विमा कंपन्यांनी देय तारखेच्या किमान एक महिना आधी प्रिमियम देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट संबंधीची माहिती पाठवणे आवश्यक आहे. जर कंपन्यांनी त्यात कुचराई केली तर ग्राहकांनी लोकपालाकडे तक्रार करावी असे IRDAI ने स्पष्ट केले आहे.

Back to top button