भिकार*ट चंद्रकांत पाटलाचा धिक्कार असो..! पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक आणि निषेधाच्या घोषणा

पुणे | चिंचवड येथे महापुरूषांची बदनामी केल्याप्रकरणी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून (Black flag) त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी पोहचलेल्या पाटील यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. भिकार*ट चंद्रकांत पाटलाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणाऱ्या व्यक्तीने करत आपला निषेध नोंदवल्याचे पहायला मिळाले.

एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तीने शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. भिकार*ट चंद्रकांत पाटलाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणाऱ्यांनी केल्याचे पहायला मिळाले. पोलिसांनी याप्रकरणी तिघाजणांना ताब्यात घेतले आहे. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते, त्यावेळी हा प्रकार झाल्याचे पहायला मिळाले. 

चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी (NSUI) आक्रमक झाले होते. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते. ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या शहरात कॉंग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.


“भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ”; कॉंग्रेसकडून बॅनरबाजी
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड  भागात लावण्यात आले आहेत. “भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ” असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. यावर काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा कार्टूनसारखा फोटो बॅनरवर लावण्यात आलं आहे. शहरात कोथरुड भागातच नाही तर इतर भागात देखील असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. 

चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान

भाजप नेते, मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विविध क्षेत्रातून निषेध सुरू होता. त्यातच या शाईफेक प्रकरणाची भर पडली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य सर्वसामान्यांना चीड आणणारं असून भाजपच्या नेत्यांनी महापुरूषांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षढयंत्र आखल्याचे चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर महापुरूषांचा अपमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत.