मुंबई | भारतीय रेल्वेने (Indian Railway Recruitment) त्यांच्या विविध झोन मध्ये भरतीप्रक्रियेची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर पूर्व रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या झोनचा समावेश आहे. या सर्व झोन मध्ये मिळून तब्बल 6404 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT/SCVT) द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असले तरी चालेल. (Indian Railway Recruitment)
खाली प्रत्येक झोननुसार भरतीचा सविस्तर तपशील दिला आहे. त्यासाठी त्या-त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तो तपासावा लागेल. (Indian Railway Recruitment)