Career

कोणतीही परिक्षा नाही, भारतीय टपाल विभागात थेट भरती; 25,200 पदांची निवड केवळ मेरिटच्या आधारावर, संधी चुकवू नका! Indian Post GDS Bharti 2024

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 2025 साठी मोठी भरती (Indian Post GDS Bharti 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 25,200 पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय केवळ मेरिटच्या आधारावर होणार आहे.


Indian Post GDS Bharti 2024- भरतीची महत्त्वाची माहिती:

  • भरतीचे नाव: भारतीय टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक (Post GDS Bharti 2025)
  • एकूण पदसंख्या: 25,200
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मार्च 2025
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 28 मार्च 2025
  • अर्जाची अधिकृत वेबसाईट: indiapostgdsonline.gov.in

शैक्षणिक पात्रता:

  • ग्रामीण डाक सेवक (GDS): उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:

  • सामान्य वर्गासाठी: 18 ते 40 वर्षे
  • आरक्षण धारकांसाठी वयोमर्यादा सवलत:
    • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 5 वर्षे
    • इतर मागासवर्ग (OBC): 3 वर्षे
    • दिव्यांग (PwD): 10 वर्षे

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS उमेदवार: ₹100
  • SC/ST/महिला/PwD उमेदवार: शुल्क माफ

पगार:

  • शुरुवातीचे वेतन: ₹10,000 प्रति महिना
  • कमाल वेतन: ₹29,380 प्रति महिना
  • निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारे वेतनवाढ आणि अतिरिक्त भत्ते मिळतील.

अर्ज प्रक्रिया:

  1. indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  3. दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य माहिती भरून अर्ज सादर करा.
  4. अर्ज अपूर्ण असल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्जाची शेवटची तारीख 28 मार्च 2025 आहे. देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या सूचना:

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे.
  • लवकरच संबंधित भरतीसाठी अधिकृत PDF जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
Back to top button