Tuesday, September 26, 2023
HomeCareerड्रायव्हिंग येतयं? मग 81,100 रूपये महिना पगाराची ही नोकरी तुमची | Indian...

ड्रायव्हिंग येतयं? मग 81,100 रूपये महिना पगाराची ही नोकरी तुमची | Indian Military Academy Recruitment 2023

मुंबई | इंडियन मिलिटरी अकादमी, देहराडून येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (Indian Military Academy Recruitment 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत आहे.

Indian Military Academy Recruitment 2023 या पदभरती अंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) – 10 जागा, एमटी ड्रायव्हर (OG) – 03 जागांचा समावेश आहे.

रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता : (Indian Military Academy Bharti 2023 )
एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) – 10 जागा – इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालविण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवरांकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असले पाहिजे.
ऐच्छिक पात्रता – वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिले जाईल.

एमटी ड्रायव्हर (OG) – 03 जागा –  इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालवण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. त्याच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असले पाहिजे.
ऐच्छिक पात्रता – वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिले जाईल. एचएमटीसारखा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यास अधिक प्राधान्य मिळेल.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा 56 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना – एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) पदासाठी – 25,500/- ते 81,100/- दरमहा, तर एमटी ड्रायव्हर (OG) पदासाठी – 19,900/- ते 63,200/-दरमहा वेतन मिळेल.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कमांडंट, इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून- 248007
अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in
Application Form : येथे क्लिक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular