मुंबई | भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इंडियन एअर फोर्स (IAF) ने विविध अग्निवीर वायु रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 3500 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
अविवाहित तरुण या भरतीसाठी पात्र असतील. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 27 जुलै पासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात. (Indian Air Force Agniveer Bharti 2023)
या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान ३० दिवसांची रजाही दिली जाईल. याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.
पात्रता निकष –
तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण असावेत किंवा इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
PDF जाहिरात – IAF Agniveer Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – IAF Agniveer Job Application 2023