Tuesday, October 3, 2023
HomeCareerकोणतीही परिक्षा नाही; पदवीधरांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मेगाभरती | India Post...

कोणतीही परिक्षा नाही; पदवीधरांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मेगाभरती | India Post Payments Bank Bharti 2023

मुंबई | पोस्ट विभागाने बॅंकिंग सेवा सुरू केल्यानंतर भारतीयांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा कार्यविस्तार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध रिक्त पदांसाठी नेहमी भरती सूरू असल्याचे पहायला मिळते.

India Post Payments Bank Bharti 2023 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “कार्यकारी” पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
वरील पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा.
निवड झालेल्या उमेदवारांना महिना 30,000 रूपये प्रमाणे वेतन मिळेल

PDF जाहिरात – India Post Payments Bank Bharti 2023
ऑनलाईन अर्जाची लिंकOnline Application
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com

निवड प्रक्रिया – मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. तथापि, बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. आयपीपीबी उमेदवारांची पात्रता, अनुभव, नोकरीच्या आवश्यकता इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक स्क्रिनिंग / शॉर्ट लिस्टिंगनंतर मूल्यांकन/मुलाखत/गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार राखून ठेवते.

भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular