Tuesday, September 26, 2023
HomeWeatherIMD Rain Alert | 'या' 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; कुठे ऑरेंज...

IMD Rain Alert | ‘या’ 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट | जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

मुंबई (29 जुन 2023) | राज्यासह देशात मान्सूनची घौडदौड सूरू असून देशातील बहुतांश राज्यात मुसळधार पाऊसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिला आहे. तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील चार जिल्ह्याना अतिवृष्टीचा इशारा दिला असून या चारही जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे.

या चार जिल्ह्यांबरोबरच हवामान खात्याने मुंबईला येलो अलर्ट (IMD Rain Alert) जारी केला आहे. मुंबईसह उपनगरात काल दिवसभर पाऊस पडल्यानंतर आज सकाळपासून पाऊस थांबला होता. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील दोन दिवस पुणे शहरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार आणि जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD Rain Alert) वर्तवली आहे. 4 जुलैपर्यंत हा पाऊस सक्रिय राहणार असल्याचे हवामाव खात्याने सांगितले आहे. 

राज्यात गेल्या 7 दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही काही जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. IMD च्या अंदाज नुसार राज्यात पुढील काही दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे. राज्यात आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

दिल्लीत चार जुलैपर्यंत मुसळधार

देशाची राजधानी दिल्लीत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दिल्लीत चार जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशातही IMD ने 31 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मध्य प्रदेश आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंडमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular