IMD Rain Alert – राज्याच्या ‘या’ भागात आज अतिवृष्टी, कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट; केरळ कर्नाटकला मात्र रेड अलर्ट
पुणे | महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर गेल्या पाच दिवसांपासून ढगांची गर्दी सुरू आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत. परिणामी कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर पहायला मिळत आहे.
हवामान विभागाने केरळ, कर्नाटक सह महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीचा (IMD Rain Alert) इशारा दिला आहे. केरळ, कर्नाटक राज्यात आज-उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात कोकण व घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5ते7 जुलै तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
- आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- पुणे आणि ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
- 5 जुलैपासून पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
- पुण्यातही पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनची देशभर हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात 8 जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनने रविवारी संपूर्ण देश व्यापल्याने पश्चिमी वार्यांना बळकटी मिळाली आहे. त्यामुळे देशभर जोरदार पाऊस सुरू असून, गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. हिमालयासह पश्चिम बंगाल भागात अतिवृष्टी सुरू आहे. गुजरातमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तेथेही अतिवृष्टी सुरूच आहे.
उत्तर भारतातही जोरदार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे काही ठिकाणी मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे (3 जुलै 2023 ) | सध्या मान्सूनने चांगला जोर पकडला असून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आजपासून पुढील चार दिवस दक्षिण कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येत्या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती IMD पुणे विभाग प्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (IMD Rain Alert)
दरम्यान आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना 4 जुलै रोजी, तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना 5 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (IMD Rain Alert)
पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भात काही जिल्ह्यांना 3 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज असल्याचे होसाळीकर यांनी म्हणटले आहे.
जिल्हा – कोल्हापूर मुख्यालयाची पर्जन्यमान दिनांक 3/07/2023
कागल – 9, गारगोटी – 12, आजरा – 18, पन्हाळा – 18, गगनबावडा – 85 (सर्व आकडे मिलीमिटर)