Tuesday, September 26, 2023
HomeWeatherमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज 'यलो अलर्ट', तर राज्यातील बहुतेक ठिकाणी...

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज ‘यलो अलर्ट’, तर राज्यातील बहुतेक ठिकाणी मुसळधार | IMD Rain Alert

मुंबई | भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) आज, गुरुवारी मध्य महाराष्ट्र (Maharashtra Rain), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

IMD ने काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर (Nagpur Rain), वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांत 16 जुलैपर्यंत ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.(IMD Rain Alert)

दुसरीकडे, जुलै महिना अर्धा संपत आला तरी अद्याप राज्यातील काही भागात अपेक्षीत पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या आहेत. पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशात हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

उत्तर भारतात पावसाचा कहर सुरूच

उत्तर भारतात (North India Rain) सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पूरस्थिती निर्माण झाली असून नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. व्यास नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून 1000 हून जास्त मार्ग बंद करण्यात आले आहेत. उत्तराखंड ते दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात देखील पूरस्थिती आहे. दिल्लीत यमुना नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ सुरू आहे. सोमवारी सायंकाळी यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नदी काठावरील शेकडो गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular