मुंबई | आज कोकण विभाग आणि कोकणतील जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापुरात मात्र पावसाने शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणी दिली आहे.
11 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
9 जुलै 2023 – पावसाबाबत हवामान खात्याकडून सुधारित अंदाज, जाणून घ्या | IMD Rain Alert
मुंबई (9 जुलै) | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD Rain Alert), राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येईल. पुढील 4,5 दिवस कोकणात देखील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आली आहे. पुढील दोन दिवस बहुतांशी महाराष्ट्रातील जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
- IMD Rain Alert – रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 9 जुलै आणि 10 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड वगळता उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला आज रेड अलर्ट तर उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सरासरी पेक्षा कमी पाऊस (IMD Rain Alert)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा पावसाची कमी नोंद झाली आहे. दुसऱ्या बाजूला यंदाच्या पावसावर एल निनोचेही सावट पाहायला मिळत असल्याने यंदा मोसमी पावसावर मर्यादा आली आहे. मात्र, पावसाचा दीर्घकालीन अंदाज पाहता सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
देशातील पावसाची स्थिती
उत्तर भारतामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या भागामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच राजस्थान, बिहार, गुजरात या राज्यामध्ये देखील पाऊस सुरू आहे.