Saturday, September 23, 2023
HomeWeatherहवामान अंदाज - पुढील 5 दिवस महाराष्ट्रासह 'या' राज्यात मुसळधार पाऊसाचा अंदाज...

हवामान अंदाज – पुढील 5 दिवस महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात मुसळधार पाऊसाचा अंदाज | IMD Rain Alert 

मुंबई | मान्सूनने देशभरात चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागांत पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनचा पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD Rain Alert) वर्तवली आहे. (Monsoon Update 2023)

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा,
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कोकण, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रातील घाट क्षेत्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. तर बुधवारी गुजरातमध्ये अतिवृष्टीची होण्याचा अंदाज आहे. (IMD Rain Alert)

आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी एएनआयला सांगितले की, “गेल्या 4-5 दिवसांत मान्सून झपाट्याने सक्रिय झाला आहे. उत्तर पश्चिम भारतातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण देशात मान्सूनचा प्रभाव दिसून येत आहे. संपूर्ण गुजरात आणि दक्षिण-पूर्व राजस्थानमध्येही मान्सून पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील उर्वरित भागही व्यापण्याची शक्यता आहे. (IMD Rain Alert)

IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर म्हणाले, “मुंबई आणि उपनगरी भागांसह कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular