Tuesday, September 26, 2023
HomeWeatherराज्यात 24तासांचा येलो अलर्ट, मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा | IMD...

राज्यात 24तासांचा येलो अलर्ट, मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा | IMD Rain Alert

पुणे | हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD Rain Alert) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काहीशी विश्रांती घेतलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.


अद्ययावत पूर्वानुमानानुसार मुंबई, ठाणे, पालघर इथे आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढच्या 2-3 तासामध्ये मुंबई आणि ठाण्यातमध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात (IMD Rain Alert) आली आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये आजही पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल.

14 ते 17 जुलै हवामान अंदाज
पुणे हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ते 17 जुलै दरम्यान कोकण, विदर्भातील काही भाग, घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 17 जुलै रोजी कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular