मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) दिला आहे. तर राज्यात पुढील 10-12 दिवस पाऊस कायम पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हणटले आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळणार असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- 18 जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
- 19 आणि 20 जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
- 21 जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली
हवामान विभागाचा अंदाज (IMD Rain Alert)
मुंबईकरांनो काळजी घ्या, 2-3 दिवस अतिमुसळधार (IMD Rain Alert)
यंदा प्रथमच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहराला 3 दिवसाचा यलो अलर्ट तर पुणे जिल्ह्यास सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, कोकणातील नद्यांना पूर
रायगड जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती 6 मीटर पातळी जवळून वाहत आहे. जगबुडीची धोका पातळी सात मीटर आहे. तर इशारा पातळी पाच मीटर आहे.
राधानगरी धरण 50 टक्के भरले
कोल्हापुरात जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी चिंताजनक असल्याचे चित्र आहे. राधानगरी धरण 50 टक्के भरले असून धरणात 4.18 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात 6.15 टीएमसीहुन अधिक पाणीसाठा होता. जिल्ह्याच्या अनेक भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर धरणातला पाणीसाठाही चिंताजनक आहे. काळम्मावाडी धरणात केवळ 5.18 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवसात काळम्मावाडी धरणात 14 टीएमसी पाणीसाठा होता.