मुंबई | बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही राज्यांत अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain Alert) वर्तवला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने मुंबई-पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD Rain Alert – हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे. IMD ने रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज असून मुंबईसह ठाण्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हा पाऊस राज्यात सर्वदूर कोसळणार असल्याने, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
IMD Rain Alert – रायगड जिल्ह्यातील शाळा आज बंद!
रायगड जिल्ह्यातील शाळा आज बंद! मुसळधार पावसामुळे #रायगड जिल्ह्यातील सावित्री आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्याही इशारापातळीच्या वर वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असल्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहतील.
गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगण आणि ओडिशामध्ये येत्या 3 ते 5 दिवसात मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.