मुंबई | हवाामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील बहुतांशी भागात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. गुरुवारी (6 जुलै) कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सध्या कोकण विभागाला हवामान खात्याने रेड अलर्ट (IMD Rain Alert) दिला आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. तर मराठवाडा, विदर्भात मात्र 8 जुलैनंतर पाऊस काहीसा ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (IMD Rain Alert)
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील सर्वच राज्यात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राज्यांना 10 जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यात अंदमानसह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा विचार करता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर असून पुणे परिसरात मात्र पाऊस काहीसा कमी झाला आहे.
राज्यातील मागील चोवीस तासात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलीमिटर मध्ये)
कोकण विभाग :
वैभववाडी 180, पालघर 146, मडगाव 140, पेडणे 131, कुडाळ 130, फोंडा 126, कणकवली 126, म्हापसा 125, देवगड 120, सावंतवाडी 110, मालवण 94, दोडामार्ग 78, साांताक्रुझ 69, वसई 66, श्रीवर्धन 61, लांजा 50.
मध्य महाराष्ट्र :
गगनबावडा 116, साक्री 62, राहुरी 61, श्रीगोंदा 54.
मराठवाडा :
मुखेड 105, कळंब 100, उदगीर 98, बिलोली 91, जळकोट 85, चाकूर 82, बीड 77, रेणापूर 75, उमरी 73, देगलूर 68, औसा, वाशी 63, घनसावंगी 60, मानवत 59, माजलगाव 58 ,उदगीर 57, परतूर 55, शिरूर 56, सोयगाव 53, पूर्णा 53.
विदर्भ :
अकोला 74, मलकापूर 51, सिंदखेडराजा 43.
गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाचा विचार करता सर्वाधिक पाऊस कोकण विभागात झाला असून वैभववाडी तालुक्यात (180 मि.मी) विक्रमी पाऊस झाला आहे. तर कोकण विभागात सर्वात कमी पाऊस लांजा तालुक्यात (50 मिमी) झाल्याचे दिसून येते.