Saturday, September 23, 2023
HomeWeatherIMD Rain Alert | येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान...

IMD Rain Alert | येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | संपूर्ण देशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, 5 आणि 6 जुलै रोजी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

हवामान खात्याने (IMD Rain Alert) ठाणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस ठाण्यातही मुसळधार पाऊस पडेल. पालघरमध्ये गुरुवारपासून तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Monsoon Update) दिला आहे.

कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात 5 आणि 6 जुलैला, गुजरातमध्ये 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Forecast) आली आहे. ओडिशा राज्यात 6 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईसाठी बुधवार ते शुक्रवार म्हणजेच 5 ते 7 जुलै दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
  • आज पुण्यामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
  • पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • मुंबई आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट.
  • गुरुवारीही पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular