Sunday, September 24, 2023
HomeNewsराज्यात पुढील काही दिवस मुसळधार तर 'या' पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट |...

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार तर ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट | IMD Rain Alert

मुंबई | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यांना यापूर्वीच रेड अलर्ट (IMD Rain Red Alert) देण्यात आला होता. दरम्‍यान, आज दुपारी भारतीय हवामान विभाग मुंबईने दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (Weather Forecast) जारी करण्यात आला आहे.

IMD Rain Alert
20 जुलै रेड अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, सातारा, पुणे
20 जुलै ऑरेंज अलर्ट – मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
21 जुलै रेड अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, पुणे
21 जुलै ऑरेंज अलर्ट – मुंबई, रत्नागिरी, सातारा

राज्यात 25 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, घाटमाथा या भागांत 25 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, तर मराठवाड्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, तसेच आगामी 24 तासांत मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुटी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular