Tuesday, September 26, 2023
HomeCareerयेत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अ‍ॅलर्ट तर 'या'...

येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अ‍ॅलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता | IMD Rain Alert

मुंबई | देशभरात मान्सून दाखल झाला असला तरी (IMD Rain Alert) काही भागात अद्याप पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता असून कोकण विभागाला रेड अलर्ट (IMD Rain Alert) दिला आहे.

मुंबई हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (IMD Rain Alert)

पुणे वेधशाळेचे IMD प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जुलै रोजी IMD GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील 24 तासांत कोकण, पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • नाशिक – पुढील 3 ते 4 तासांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.
  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.
  • हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular