कोल्हापूर | हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आज कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.

दि. 26/07/2023. दु. 2:00 वा.
राजाराम बंधारा पाणी पातळी – 40ʼ05” (542.51m)
विसर्ग : 60106 cusecs
(पंचगंगा नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी – 43’00”)
एकुण पाण्याखालील बंधारे – 81
कोल्हापूरसह ‘या’ पाच जिल्ह्याना ‘रेड अलर्ट’, अतिमुसळधार पावसाची शक्यता | IMD Rain Alert
मुंबई | राज्याच्या विविध भागात सध्या पावसाने (IMD Rain Alert) धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत असून अनेक ठिकाणी पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने आज कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. यापूर्वी हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. परंतु हवामान बदलानुसार पावसाची परस्थिती पाहता रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
IMD Rain Alert – सध्या मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता
आयएमडीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अशा एकूण 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन
दरम्यान IMD ने आज दिलेला पावसाचा इशारा पाहता प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोणतीही परिस्थिती ओढावल्यास मदतकार्यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाच्या वतीने नागिरकांना या अशा स्थितीत गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका, असे आवाहन केले आहे.