Sunday, September 24, 2023
HomeCareer10, 12वी ते पदवीधरांना ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत नोकरीची संधी; 78 रिक्त...

10, 12वी ते पदवीधरांना ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत नोकरीची संधी; 78 रिक्त पदांची भरती | ICMR NIMR Recruitment 2023

मुंबई | ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (ICMR-National Malaria Research Institute) अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

या पदभरतीसाठी अर्ज शुल्क 300 रूपये असून इच्छूकांनी आपले अर्ज संचालक, राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर – 8, द्वारका, नवी दिल्ली -110077 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज पाठवेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेतली जाईल. (ICMR NIMR Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता (ICMR NIMR Recruitment 2023)

तांत्रिक सहाय्यक – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीत तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा/संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी.
तंत्रज्ञ – विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण
प्रयोगशाळा परिचर – 10 वी किमान 50 टक्के मार्कानी उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे –

  • जन्मतारखेचा पुरावा.
  • इयत्ता-दहावी पासूनच्या शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.
  • कामाच्या अनुभवाचा पुरावा
  • सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी वय शिथिलतेसाठी अनुभवाचा पुरावा; विहित नमुन्यात (परिशिष्ट-I).
  • EWS उमेदवारांसाठी उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र, विहित नमुन्यात (परिशिष्ट-II)
  • श्रेणीचा पुरावा म्हणजे SC/ST/OBC/PWD/ESM ETC.
  • ना हरकत प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे).
  • ओबीसी उमेदवारांद्वारे सादर करण्यात येणारी घोषणा (परिशिष्ट-VII)
  • अनुभवाचा तपशील, ICMR प्रकल्पांमध्ये सतत काम करणाऱ्या उमेदवारांसाठी विहित नमुन्यात (परिशिष्ट-III)

उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अथवा स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

PDF जाहिरात – https://shorturl.at/uTY56
अधिकृत वेबसाईटnimr.org.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular