मुंबई | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS RRB Recruitment 2023) अंतर्गत अनेक रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 जून 2023 असणार आहे.
या पदभरती अंतर्गत कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. (IBPS RRB Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल-I (AM) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
जनरल बँकिंग ऑफिसर (व्यवस्थापक) स्केल-II : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
आयटी ऑफिसर स्केल-II : इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
CA ऑफिसर स्केल-II : भारताच्या चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेकडून प्रमाणित सहयोगी (CA) असणं आवश्यक आहे.
कायदा अधिकारी स्केल-II : कायद्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.
ट्रेझरी मॅनेजर स्केल-II : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्समध्ये एमबीए असणं आवश्यक आहे.
मार्केटिंग ऑफिसर स्केल-II : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीए असणं आवश्यक आहे.
कृषी अधिकारी स्केल-II : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशुसंवर्धन/ वनशास्त्र/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन या विषयातील पदवी किंवा एकूण किमान ५०% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल III (वरिष्ठ व्यवस्थापक) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र या विषयातील पदवी/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
PDF जाहिरात | https://bit.ly/2Bqx7tF |
ऑनलाईन अर्ज करा (Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose)) | https://shorturl.at/niK11 |
ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” – Officers (Scale-I)) | https://shorturl.at/EFfr3 |
ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” – Officers (Scale-II & III)) | https://shorturl.at/rtfWE |
अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |