मुंबई | IBPS सिलेक्शन द्वारे PO पदांसाठी 3094 रिक्त जागांची नवीन जाहिरात प्रकाशित (IBPS PO-MT Recruitment 2023) करण्यात आली आहे. IBPS ने यासंदर्भात नवीन अधिसूचना प्रकाशित केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, “प्रोबेशनरी ऑफिसर/मापन प्रशिक्षणार्थी”च्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सरकारी बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आज पासून, म्हणजेच 01 ऑगस्ट 2023 रोजी सुरू होईल. तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 21 28 ऑगस्ट 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता – Graduate Degree (Read PDF)
1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल.
3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक.
4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये विविध 11 बँकामध्ये नोकरीची संधी आहे. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि अन्य बँक मध्ये नोकऱ्या मिळतील.
PDF जाहिरात : IBPS PO/MT Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – IBPS PO-MT Recruitment Application