Sunday, September 24, 2023
HomeCareerपदवीधरांना 'क्लार्क' पदासाठी सरकारी नोकरीची संधी; 4045 रिक्त जागांसाठी भरती | Govt....

पदवीधरांना ‘क्लार्क’ पदासाठी सरकारी नोकरीची संधी; 4045 रिक्त जागांसाठी भरती | Govt. Job

मुंबई | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) ने देशातील 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

IBPS लिपिक CRP XIII साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू होईल आणि 28 जुलैपर्यंत (मुदतवाढ) चालेल. IBPS लिपिक भरती परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाईल. प्रथम प्राथमिक परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लिपिक पदासाठी निवड केली जाईल.

IBPS लिपिक भरती परीक्षेसाठी वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 जुलै 2023 रोजी वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. IBPS लिपिक भरतीची प्राथमिक परीक्षा 26, 27 ऑगस्ट, 02 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. त्याची मुख्य परीक्षा 07 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

IBPS अंतर्गत होत असलेली ही लिपिक भरती 4045 जागांसाठी होणार आहे. या संदर्भातील शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. (IBPS Clerk Bharti 2023)

वरील पदांकरिता पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती अर्जात नमूद करावी अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी. (IBPS Clerk Bharti 2023)

SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. तर इतर उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

PDF जाहिरातhttps://ibps_recruitment/
ऑनलाईन अर्ज करा https://ibps_application/
अधिकृत वेबसाईटwww.ibps.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular