जर तुम्हाला जगभरात फिरत फिरत पैसेही कमवण्याची संधी मिळाली तर…? हो! कारण हे शक्य आहे प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी.. प्रवासाची आवड असणाऱ्या लोकांसाठी पर्यटन क्षेत्र कमाईच्या बाबतीत खूप चांगले क्षेत्र आहे. (How to Earn Money with Travelling)
पर्यटन क्षेत्रात कमाईची चांगली संधी असली तरी, या क्षेत्रात नक्की करिअर कसे करावे? यात शिक्षण कसे आणि कोणते घ्यावे याविषयी अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया… (How to Earn Money with Travelling)
पर्यटन क्षेत्रात काम करण्यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. बारावी नंतर या क्षेत्राच्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश घेता येतो. अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्लेसमेंट ऑफर करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तसेच तुम्हा स्वतः देखील असा कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांपासून ते तुमच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी प्रवास योजना बनवून त्यातून चांगली कमाई करू शकता. (Travel around the world and earn money while traveling)
बारावीनंतर ‘हा’ कोर्स करा
पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला पर्यटन प्रशासनात बीए किंवा बीबीए पदवी घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही पदव्युत्तर पदवीमध्ये ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये एमबीए करू शकता. कमी वेळात ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये डिप्लोमाही करू शकतात.
‘या’ठिकाणी मिळेल चांगले शिक्षण
तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर, आयआयटीएम नेल्लोर, ईआयटीएम भुवनेश्वर, क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोर आणि जामिया सारख्या देशातील प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकता. याठिकाणी तुम्हाला चांगल्या शिक्षणाबरोबर लवकरात लवकर चांगल्या कमाईची संधी उपलब्ध होईल.
भारतात देखील मोठ्या संधी
भारतामध्ये पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. देशातील प्रत्येक राज्य पर्यटनाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. महाराष्ट्रात देखील पर्यटनाला मोठा वाव आहे. महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. देशातील विविध राज्यांच्या बाबतीत देखील हेच पहायला मिळते, त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिल्यास नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
‘या’ विविध ठिकाणी आहेत संधी
पर्यटन क्षेत्रातील शिक्षण घेतल्यास.. माहिती सहायक, गाईड (मार्गदर्शक), टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल क्षेत्र, विमान कंपन्या, वाहतूक सेवा इत्यादी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. एअर होस्टेसपासून ऑपरेशन व्यवस्थापकापर्यंत पर्याय उपलब्ध होतात. पर्यटन क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यटन संचलनालय विभागात स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरी मिळू शकते. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील अनेक नोकऱ्या मिळू शकतात. परदेशी कंपन्यात देखील चांगल्या संधी आहेत. याबरोबरच विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.