Google मध्ये नोकरी करायची आहे? मग ‘या’ठिकाणी करा अर्ज; संधी सर्वांसाठी | Jobs in Google

मुंबई | गुगलमध्ये नोकरीची संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. शिकण्याची भरपूर संधी, उत्तम पगार, जोडीने इतर सुविधा, वर्क कल्चर इत्यादी अनेक कारणांमुळे गुगलमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. इंजिनिअर, एमबीए, कंटेट रायटर, कंटेट क्रिएटर अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. परंतु गुगलमध्ये नोकरी (Jobs in Google) मिळवण्यासाठी कसा अर्ज करा आणि कुठे करायचा हेच बऱ्याचजणांना माहिती नसते. चला तर आज आपण याबद्दल जाणून घेऊया..

पदवी, पदव्युत्तर पदवी, Diploma धारक गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. जगभरातून यासाठी लाखो अर्ज येतात. त्यामुळे गुगलने या सर्वाना एकाच ठिकाणी अर्ज करता यावा यासाठी खास वेबसाईट तयार केली आहे. गुगलने बनवलेल्या या वेबसाईटचे नाव https://careers.google.com/ असे आहे.

Google मध्ये नोकरीसाठी एका व्यक्तीने किती वेळा अर्ज करावा यासाठी काही निर्बंध घातले आहेत. 30 दिवसांत जास्तीजास्त 3 वेळाच तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे अर्ज करत असताना जॉब डिस्क्रिप्शन नीट पाहून आपला प्रोफाईल मॅच होत असेल तरच अर्ज करणे गरजेचे आहे.

Google Career च्या साईटवर गेल्यानंतर पहिल्यांदा लॉगिन करावे लागते. यासाठी तुम्ही तुमचे Gmail चे लॉगिन वापरू शकता. लॉगइन केल्यानंतर रोल आणि लोकेशन अशा दोन प्रकारे जॉब शोधता येतो. त्यानंतर संबंधित जॉबवर क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

गुगलमध्ये जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सतत व्हॅकन्सी असतात. तसेच नोकरी मिळाल्यानंतर अतिशच चांगल्या सोईसुविधा देखील गुगलकडून मिळतात. त्यामुळे या साईटवर नियमित लक्ष ठेवले तर आपल्या प्रोफाईलला मॅच होईल असा जॉब हमखास मिळू शकतो.

Google ने नवी मुंबईत 28 वर्षांसाठी भाड्याने घेतली जागा, महिन्याचं भाडं आहे कोटींच्या घरात; वाचून व्हाल हैराण

गुगलने जगभरातील आपला विस्तार सुरूच ठेवला आहे. आता गुगलने नवी मुंबईत भाड्याने जागा घेतली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 28 वर्षांसाठी गुगलने ही जागा भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा करार झाल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या दोन वर्षांत नवी मुंबईत डेटा सेंटर सुरू करण्याचा गुगलचा मानस आहे.

नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरची जागा आहे. रेडेन इन्फोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गुगल इंक कंपनीने आमथिन इन्फो पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जागा घेतली आहे. याचं महिन्याचं भाडं तब्बल 8.83 कोटी रुपये आहे. हा करार पुढच्या 28 वर्षांसाठी झाला आहे. दोन्ही कंपन्यांनी याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, ऑक्टोबर 2022 मध्येच या करारावर स्वाक्षरी झाल्याची चर्चा आहे.