महाराष्ट्र होमगार्ड भरती; 15 जानेवारी पर्यंत अर्ज करा | HomeGaurd Bharti 2023

1. राज्यभरात होणार होमगार्डची नियुक्ती
2. सध्या हिंगोली जिल्ह्यात होमगार्डसची भरती
3. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी होमगार्डस् भरती करण्यात येणार 

हिंगोली | होमगार्ड नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (HomeGaurd Bharti 2023) ही महत्वाची बातमी आहे. विविध कारणांमुळे ज्या होमगार्डने आपली सेवा समाप्त केली आहे, त्यांनी महाराष्ट्र होमगार्डमध्ये समाविष्ट करण्याची विनंती कमांडिंग ऑफिसरमार्फत करावी, असे जिल्हा आयुक्त हिंगोली यांनी कळविले आहे. उमेदवारांनी 15 जानेवारी 2023 पूर्वी त्यांचे अर्ज पाठवणे आवश्यक आहे. देय तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

वरील कालावधीत कमी करण्यात आलेल्या होमगार्डनी त्यांचे अर्ज समादेशक अधिकारी यांच्यामार्फत दि. १५ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांनाच यात अर्ज करण्याची संधी आहे, अशी माहिती जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिली.

  1. होमगार्डंनी संघटनेत सामावून घेण्यासाठी आपले विनंती अर्ज समादेशक अधिकारी यांच्यामार्फत दि.15/1/23पर्यंत करावेत.यानंतर आलेल्या विनंती अर्जाचा विचार हाेणार नाही याची नोंद घ्यावी,असे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी कळविले आहे..
  2. प्रपत्र अ व ब समादेशक अधिकारी होमगार्ड पथक, हिंगोली, वसमत व कळमनुरी या कार्यालयात उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले.
  • सेवा समाप्त केलेल्या होमगार्डनी प्रपत्र अ नुसार स्वतःचा विनंती अर्ज सादर करावा. प्रपत्र ब नुसार कुठल्याही संघटनेचा सदस्य नाही व होणार नाही तसेच आंदोलन, मोर्चे, उपोषण इत्यादीत भाग घेणार नाही.
  • बेशिस्त वर्तन करणार नाही, याचे बंधपत्र द्यावे लागेल. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 

राज्यभरात होणार होमगार्डची नियुक्ती

  • महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील Government and local self-governing bodies School) विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी (Students Safety) गृहरक्षक दलाचे जवान (Home Guard) नियुक्तीबाबत गृहखाते शिक्षण संचनालय व महासमादेशक कार्यालय (Directorate of Home Education and Office of the Director General)यांनी कार्यवाही सुरू केली आहे.
  • त्यामुळे राज्यातील किमान सात हजार होमगार्ड सैनिकांना रोजगार (Home Guard Recruitment) मिळणार आहे.
  • विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी होमगार्डची सेवा राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य शासनाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
  • याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक झाली.