डार्क सर्कलने त्रस्त आहात? तर मग ‘हा’ घरगुती उपाय नक्की करा | Home Remedies for Dark Circles

मुंबई | अनेक लोकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं किंवा डार्क सर्कल्स दिसतात, जे सहजपणे जात नाही. डोळ्यांखाली ‘डार्क सर्कल’ म्हणजेच काळे वर्तुळ (Home Remedies for Dark Circles) ही अगदी सामान्य समस्या आहे. परंतु याचा मोठा परिणाम आपला चेहरा व व्यक्तीमत्वावर पडत असतो. खासकरुन महिलांमध्ये याबाबत फार चिंता दिसून येत असते. काळे वर्तुळ घालवण्यासाठी कृत्रिम साधणांचा वापर केला जात असतो. काळ्या वर्तुळांना मुळापासून नष्ट करण्यासाठी केळं आणि कोरफड यांच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्स सहज हटवू शकाल तसेच त्वचेच्या अनेक समस्याही दूर होऊ शकतील.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी बाजारात अनेक महागडी उत्पादने उपलब्ध असतात, पण त्यामुळे ही समस्या पूर्णपणे दूर होतेच असं नाही. तसेच या उत्पादनांच्या वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणामही दिसू शकतात. काही नैसर्गिक उपायांच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्सची समस्या सहज दूर करू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा डागविरहीत व सुंदर दिसू शकेल.

डार्क सर्कल्सचे कारण
डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणे असतात. शरीरात मेलानिनचे उत्पादन जास्त झाल्यास, तसेच एग्झिमा आणि पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात.

डार्क सर्कल्स कमी करण्याचे उपाय
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. त्यासाठी एक केळ घेऊन ते मॅश करावे. त्यामध्ये अर्धा चमचा कोरफड जेल मिक्स करून डार्क सर्कल्सवर लावावे व हलक्या हाताने डोळ्यांखाली मसाज करा. थोड्या वेळाने ही पेस्ट सुकल्यानंतर डोळ्यांखालील भाग व चेहरा स्वच्छ धुवावा. ही पेस्ट लावल्याने काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

त्वचा मॉयश्चराइज्ड राहते
केळी आणि कोरफड यांचे मिश्रण त्वचेचा कोरडेपणा दूर करून आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांची त्वचा मॉयश्चराइज्ड आणि मुलायम राहते.

सूज दूर होते
औषधी घटकांनी समृद्ध असलेले कोरफड जेल हे डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, ही पेस्ट नियमितपणे लावल्याने डार्क सर्कल्ससह, सूज देखील कमी होऊ लागते.