News

इम्तियाज जलील कोल्हापूर आला तर पायताणाने ठोकून काढू; कुणी दिला इशारा.. वाचा.. Imtiaz Jaleel

कोल्हापूर | माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात आले, तर कोल्हापुरी पायताणाने ठोकून काढू, कोल्हापूर बंद ठेवू, असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे. बुधवारी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजीत पत्रकार परिषदेत गजानन तोडकर, सुनील सामंत, उदय भोसले, दीपक देसाई, शिवानंद स्वामी यांनी हा इशारा दिला.

विशाळगडावरील घटना का घडली? येथे अतिक्रमणाला कोणी परवानगी दिली? अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलनाची वाट का पाहिली? असे प्रश्न यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले. घडलेल्या घटनेला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे. अटक केलेल्या ‘त्या’ शिवभक्तांच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठाम आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमणे आहेत. ती काढावीत, अशी मागणी शिवभक्त करत होते; पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अतिक्रमणे हटवण्यात टोलवाटोलवी केली आणि आंदोलनाची वाट प्रशासनाने का बघितली? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर सोमवारपासून विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात झाली. वेळीच अतिक्रमणे काढली असती, तर ही वेळच आली नसती. शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, अटक केलेल्या शिवभक्तांना सोडा, शिवभक्तांवर एकतर्फी गुन्हे दाखल करू नका, असेही यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला निरंजन ढेरे, अर्जुन आंबी, मनोहर सोरप, योगेश केरकर, विशाल बोंगाळे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button