News

\’शाहीर पिराजीराव सरनाईक ट्रस्ट\’तर्फे पूरग्रस्तांना मदत, जनावरांच्या खाद्याची देखील केली व्यवस्था

कोल्हापूर | शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांच्या ११५ व्या जयंतीचे औचित्य साधून पिराजीराव सरनाईक ट्रस्ट आणि रंकाळा हेल्थ ग्रुपतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांना यावेळी मदतीचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूरचे शाहीर पिराजीराव सरनाईक यांची ११५ वी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून शाहिर पिराजीराव यांचे नातू अमर सरनाईक आणि रंकाळा हेल्थ ग्रुप यांच्यातर्फे मठातील पूरग्रस्तांना मदतीबरोबर पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी चारा म्हणून कडबा कुट्टीचे वाटप करण्यात आले.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे पूरग्रस्तांची राहण्याची, तसेच त्यांच्यासोबतच्या जनावरांची दसरा चौकातील पटांगणात व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा पूरग्रस्त बांधवांना कोल्हापूरकरांकडून होत असलेली मदत मोलाची ठरत आहे.

\"\"

यावेळी पिराजीराव सरनाईक ट्रस्टचे अमर सरनाईक, रंकाळा हेल्थ ग्रुपचे रमेश चावरे, अविनाश कुंभार, मनपा अधिकारी तसेच संदीप शिंदे, विजय वरुटे, नितीन सूर्यवंशी, प्रतीक गावडे, दीपक पाटील, सौरभ जोशी, आदी उपस्थित होते.

Back to top button