Healthy Benefits of custard apple – सीताफळाचे झाड मध्यम आकाराचे असते. याची उंची बारा ते पंधरा फूट असून उंच कोरड्या, उष्ण व अवर्षणग्रस्त भागातील हलक्या जमिनीत वाढते. सीताफळात प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, बी-1, बी-2 व ‘सी’ ही जीवनसत्त्वे आढळतात. सीताफळाची पाने औषधी गुणधर्मयुक्त असतात तसेच सीताफळाची चव गोड व पौष्टिक असते.
Healthy Benefits of Custard Apple
कच्च्या सीताफळांच्या बियांचे चूर्ण केसांना लावल्यास केसातील उवा मरतात. शरीरातील थकवा सीताफळ खाल्ल्याने थकवा दूर होतो. हे फळ शीत, वातुळ, पित्तशामक, कफकारक, मधुर, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक व उलटी बंद करणारे आहे परंतु त्याबरोबरच जास्त सीताफळ खाल्ल्याने पोटात गॅस, जुलाब होण्याची व ताप येण्याची शक्यता असते.
सीताफळाचे विविध औषधी गुणधर्म खालीलप्रमाणे –
1. सिताफळातील दाहक-विरोधी क्रिया दम्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे दम्याचा आजार असणाऱ्या व्यक्तींना दम्याचा धोका कमी करण्यासाठी सीताफळाचे सेवन उपयुक्त ठरू शकते.
2. सीताफळामध्ये व्हिटॅमिन-B6 पुरेशा प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन-B6 चे सेवन हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी सीताफळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
3. सीताफळातील फायबर या घटकामुळे शरीरातील पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. (Healthy Benefits of custard apple) दुपारच्या वेळी सीताफळाचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत चालते.
4. एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर ती सीताफळामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकाच्या सेवनाने काही प्रमाणात कमी होऊ शकते.
5. सीताफळातील व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.यामुळेच सीताफळाला बलवर्धक असेही म्हणतात.
6. गरोदरपणात नियमित सीताफळ घेतल्याने गर्भपाताचा धोका कमी होतो, कारण सीताफळ हे शीत म्हणजे थंड प्रकारात मोडते. (Healthy Benefits of custard apple) त्यामुळे गरोदर महिलांसाठी सीताफळ अतिशय उपयुक्त ठरते.
7. सिताफळामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते तसेच टाईप २ प्रकारातील मधुमेहाचा धोका कमी होतो.
8. सीताफळामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात, यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
9. व्हिटॅमिन बी 6 या सीताफळातील घटकाने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
10. सीताफळ मूड बूस्टर म्हणून ओळखले जाते, कारण यातील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मेंदूला शांत करण्यासाठी (Healthy Benefits of custard apple) आणि मूड स्विंग्स, ताण-तणाव कमी करण्यासाठी मदत करतात.
आहारात सीताफळ खालील प्रकारे वापरले जाऊ शकते –
– सीताफळची आईस्क्रीम बनवून खाऊ शकता.
– सीताफळ इतर फळांसोबत फ्रूट सॅलड म्हणून खाऊ शकतो.
– सीताफळाच्या लगद्यामधील बिया काढून त्याची स्मूदी बनवता येते.
– मिल्क शेक द्वारे सीताफळ देखील घेता येऊ शकते.
सध्या सीताफळाचा हंगाम सुरू आहे. शरीरासाठी उपयुक्त असलेले मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉईड्स हे घटक सीताफळमध्ये असतात, त्यामुळे केवळ मधुमेहाचाच धोका कमी होत नाही तर रक्तदाबसुद्धा नियंत्रित करण्यास मदत होते. (Healthy Benefits of custard apple) व्हिटॅमिन सी आणि राइबोफ्लेविन हे सीताफळातील महत्वाचे घटक आपल्या डोळ्यांची देखील काळजी घेतात. अशाप्रकारे सीताफळ वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या उपयोगी पडते.
(टीप – सीताफळ हे फक्त सिझन मध्येच खाणे योग्य असून अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने पोटात गॅस, जुलाब होण्याची व ताप येण्याची शक्यता असते.)