News

पावसाळ्यात मुलांना फळं खायला देताना ‘ही’ काळजी घ्या | Health Tips

Health Tips: पावसाळा हा निसर्गाचा आनंद घेण्याचा ऋतू असला तरी, या हंगामात मुलांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. विशेषतः पावसाळ्यात मुलांना फळे खायला देताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना कोणती फळे खायला द्यावीत आणि कोणती फळे खायला देऊ नयेत. ज्यामुळे लहान मुले आजारी पडणार नाहीत किंवा ती फळे खाल्ल्याने मुलांना त्रास होणार नाही.

फळांमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मुलं निरोगी राहायला मदत होते हे जरी खरे असले तरी, बऱ्याच वेळा पालकांना हा ही प्रश्न पडलेला असतो की फळं दिल्यानंतर मुलांना सर्दी, कफ, खोकला होतो किंवा फळं खाल्ली की मुलांना त्रास होतो.. म्हणूनच याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

1) फळे खायला देण्याची योग्य वेळ कोणती – Right time to eat  Fruits
डॉक्टर नेहमी सांगतात की, मुलांना रोज एक फळ खायला देणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार गरजेचे आहे. ही चांगली सवय असली तरी अनेक वेळा आपण फळे खायला देताना वेळ पहात नाही. मनात येईल तेव्हा फळं खायला दिली जातात. परंतु असं वेळी-अवेळी फळं खायला देणं चुकीचं असून मुलांना फळ खायला देत असताना सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत द्यावीत. मुले सकाळी लवकर उठल्याबरोबर किंवा रात्री उशीरा फळं खाण्यास देऊ नयेत. त्यामुळे पोटविकार, अपचन होण्याची अधिक शक्यता बळावते.

2) उपाशीपोटी किंवा खूप भूक लागल्यावर फळ खायला देऊ नयेत –  Do not Eat Fruits with Empty stomach

उपाशीपोटी किंवा भूक लागल्यावर मुख्य अन्न म्हणून फळं खाऊ नयेत. नेहमीचा योग्य आहार घेतल्यानंतरच फळं खायला देणं गरजेचं आहे. नेहमी काहीतरी खाल्ल्यानंतरच फळ द्यावीत. फळांचा समावेश हा नेहमीच मुख्य अन्नाऐवची दुय्यम अन्न म्हणूनच करायला हवा. मुलांना अगदी थोडीशी भूक लागलेली असताना खायला देण्यास हरकत नाही.

3) सालासकट फळे द्यावीत –

फळांच्या सालामध्ये अनेक आवश्यक अन्नघटक समाविष्ट असतात, परंतु अनेक पालक मुलाना फळं खायला देताना त्याची साल काढून खायला देतात. असं न करता मुलांना आपण जी फळं खायला देतो ती विशेषत: फळांच्या सालीसकट खायला देणं आरोग्यासाठी फायदेशिर ठरतं. सालीमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन असतात. जर एखाद्या मुलाला साल पचतच नसेल तर मात्र अशावेळी साल काढून फळं खायला द्यावीत.

4) फ्रीजमध्ये ठेवलेली फळं खाणं टाळावे – Avoid Refrigerated Fruits

सध्या घरोघरी फ्रीजचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक घरातील अन्नपदार्थ, फळं फ्रीज मध्ये ठेवून खाल्ली जातात. परंतु फ्रीज मधील अन्नपदार्थ खाल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच फ्रीजमध्ये ठेवलेली फळं ही ताबडतोब मुलांना खायला देऊ नका. फ्रीजमध्ये जर फळं ठेवत असाल तर ती थोडा वेळ बाहेर काढून ठेवा. फळं सामान्य वातावरणामध्ये थोडावेळा राहिल्यानंतर मगच ती मुलांना खायला द्या.

5) मुख्य अन्न म्हणून फळांचा समावेश करू नका – Do Not Eat Fruits with Main Meals

मुलांनी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण अथवा रात्रीच जेवण घेतल्यानंतर किंवा जेवणासोबत अनेकदा आपण त्यांना फळं खायला देतो. मात्र असं करता अर्धा ते पाऊण तासाच्या नंतर मुलांना फळ खायला द्यावीत.

6) आंबट – गोड फळं वेगवेगळी खायला द्या – Do Not Mix Citrus Fruits with Sweet ones

मुलांना देण्यासाठी आपण जी फळे आणतो, त्यामध्ये काही फळं आंबट तर काही फळं गोड असतात. आपण आंबट – गोड फळं एकत्र करून ती मुलांना खायला देतो. मात्र असं केल्यानं अपचन, पोट दुखी, पोट विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळं आंबट गोड फळ वेगवेगळी करून खायला द्यावी.

7) फळांवर चाट मसाल्याचा वापर करू नका – Do Not Sprinkle Salt or Sugar or Chat masala in Fruits

मुलांना फळं खायला देत असताना त्यावर तिखट-मीठ आणि चाट मसाला टाकून ती खायला देत असतो. फळांवर तिखट-मीठ आणि चाट मसाला टाकल्याने फळांची मुळ चव बिघडते. तसेच त्यातील घटकांवर रासायनिक प्रक्रिया होण्याची देखील दाट शक्यता असते. त्यामुळे फळांवर तिखट-मीठ आणि चाट मसाला न लावता मुलांना फळ खायला द्यावीत.

8) फळं कापण्या अगोदर स्वच्छ धुवावीत – Do not  wash fruits after Cutting

मुलांना फळ खाण्यासाठी देताना ती प्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर फळं कापावीत. अशी कापलेली फळं पुन्हा धुऊ नयेत. जर आपण फळ कापून धुतली तर त्यातील न्यूट्रिशन, पोषक घटक निघून जातात.

9) फळं खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे टाळा – Do not Drink Cold water right after  having fruits

लहान मुलांना फळ खायला दिल्यानंतर त्याला लगेचच थंड पाणी प्यायला देऊ नका. असं केल्याने पोट बिघडण्याची दाट शक्यता असते. उलटी, अपचन, पोटदुखी असे विकार उद्भवू शकतात. फळं खाल्यानंतर थोड्यावेळानं कोमट पाणी दिल्यास फळं पचायला सोपी जातात.

10) फळ कापून फारवेळ ठेवू नका – Avoid eating fruit that have been cut too long

 फळ कापल्यानंतर ती फार वेळ उघड्यावर किंवा साठवून ठेवू नका. कारण अशा वेळी फळं नाशवंत होण्यास सुरवात होत असते. त्याचबरोबर फळ कापून ती उघड्यावर ठेवल्यास त्यावर माशा किंवा किडे बसून ती खाण्यास अयोग्य बनतात. त्यामुळं फळं खाण्यापूर्वी ती फार वेळ कापून ठेवू नका.

अशा छोट्या-छोट्या पण महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष दिल्यास आपण आपल्या मुलांचे आरोग्य चांगले आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो.

टीप:

  • प्रत्येक मुलं वेगळं असतं आणि काही मुल इतरांपेक्षा अधिक संवेदनशील असतात.
  • मुलाला काही विशिष्ट आहार संबंधी अडचणी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Source
आरोग्यदेशा
Back to top button