कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत जाणून घ्या मलबेरीचे फायदे | Health Tip

मलबेरी हे फळ तुमच्या केवळ एका नव्हे तर अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते. (Health Tip) मलबेरी लोहाची कमतरता पूर्ण होते. त्यात रिबोफ्लेविन असते, जे तुमच्या ऊतींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. चला तर मग जाणून घ्या मलबेरीचे फायदे.

कोलेस्टेरॉल कमी करते
कोलेस्टेरॉल हा शरीरातील पेशीमध्ये असलेला महत्त्वाचा फॅटी मॉलिक्यूल आहे. मात्र रक्तातील उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे हृदयविकाराची जोखम वाढू शकते. काही अभ्यासांमध्ये असे सुचवण्यात आले आहे की, मलबेरी जास्तीचे फॅट्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

कर्करोगाचा धोका कमी करते
पांढर्‍या मलबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड्ससह कर्करोगाशी लढा देणारे विविध अँटिऑक्सिडंट असतात. तुमच्या शरीरातील वाढलेल्या ताणामुळे पेशी आणि ऊतींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. कर्करोगावर उपाय म्हणून शेकडो वर्षांपासून मलबेरी पारंपारिक चीनी औषधांचा एक भाग आहे.

पचनशक्ती वाढवते
मलबेरीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. जर तुम्हाला पोटदुखी असेल किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर मलबेरीचा रस जरूर प्या. यामध्ये असणारे फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवते आणि अशावेळी पोटाच्या समस्या होत नाहीत.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते
मलबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

दृष्टी वाढवते
मलबेरी एका अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करतात ज्यामुळे दृष्टी वाढते. यासोबतच डोळ्यांच्या संसर्गापासूनही संरक्षण करते. मोतीबिंदू सारख्या आजारात मलबेरी खाणे खूप फायदेशीर आहे.