8 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

काळे तीळ आरोग्यासाठी आहेत खूपच फायदेशीर… जाणून घ्या याचे महत्वाचे फायदे l Health benefits of Black Sesame Seeds

आपल्याकडे एक तीळ सात जणांनी खाल्ला होता असे म्हणतात. तो कोणता तीळ हे फारसे महत्त्वाचे नसले तरी हा काळा तीळ मात्र आहारात असणे खूपच महत्वाचे आहे. तीळ आरोग्यवर्धक असतात. (Health benefits of Black Sesame Seeds) हिवाळ्यात आवर्जून तीळ खाल्ले जातात कारण तीळ उष्णतावर्धक असतात.

Health benefits of Black Sesame Seeds

काळ्या तीळातील पोषक घटक

प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम ओमेगा-3 कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज, लोह, जस्त, सॅच्युरेटेड फॅट, मोनोसॅच्युरेटेड फॅट इत्यादी पोषक घटक असतात.

काय आहेत काळे तीळ खाण्याचे फायदे

1. काळे तीळ शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्याचे काम करतात, (Health benefits of Black Sesame Seeds) तसेच हृदयविकाराचा धोका कमी राहतो.

2. दररोज सकाळी काळे तीळ आणि गूळ एकत्र घेतल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

3. काळे तीळ डोळ्यांसाठी फारच उपयुक्त आहेत. (Health benefits of Black Sesame Seeds) दररोज काळे तीळ आहारात घेतल्याने तुमची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

4. लिंबाच्या रसात काळे तीळ दररोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने वजन कमी होते.

5. काळया तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3 हे पोषक घटक असतात (Health benefits of Black Sesame Seeds) जे आपल्या केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असतात.

6. काळ्या तिळाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेवरही आराम मिळतो कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि असंतृप्त चरबी असते.

7. काळ्या तिळातील अँटीऑक्सिडंट शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

8. तिळातील कॅल्शियम हाडांची मजबुती वाढविण्याचे (Health benefits of Black Sesame Seeds) काम करतात.

(हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा)

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles